नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री बल्लाळेश्वर पाली सुधागड

श्री क्षेत्र बल्लाळेश्वर हे अष्टविनायकातील एक महत्त्वाचे गणेशस्थान आहे

खोपोली पाली या रस्त्यावर बसने एक तासात पोहचावे इतके जवळ आहे

शिवाय मुंबई गोवा महामार्गावर  नागोठणे येथील पाली फाटा आहे तेथून हे केवळ सात किलोमीटर अंतरावर आहे

हे मंदिर पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेचा मूर्तीचे आहे. या मूर्तीवर दक्षिणायनात सूर्यकिरण पडतात. हे मंदिर चिर्‍याचे बनवले आहे.

या मंदिराच्या बाजूला एक छोटे पाण्याचे तळे आहे त्याच्या शेजारी भलीमोठी पुरातन घंटा आहे

 या मंदिरात धुंडिविनायक व बल्लाळ गणेश या दोन मोठ्या मुर्त्या आहेत प्रथम धुंडिविनायकाचा दर्शन घेऊन मग बल्लाळेश्वराचं दर्शन घेतात

अशी रीत आहे. पाली येथे भक्तांच्या वास्तव्यासाठी व भोजनासाठी उत्तम व्यवस्था आहे.