नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर

टेकडीवरील गुहेत असलेले अष्टविनायकातील हे गणेशस्थान आहे

हिमालय या गिरी राजाची कन्या गिरिजा व तिच्या आत्म्यापासून निर्माण झालेला गिरिजात्मक असे हे श्री गिरिजात्मकाचे गणेश मंदिर आहे.

प्रत्यक्षात शंकराने या ओंकारस्वरूप गणेशाचे ध्यान केले आहे.

पार्वतीला ही गणेशाच्या दर्शनाची ओढ लागली होती.

त्यामुळेच निर्णाण पूर म्हणजेच जुन्नर येथे टेकडीवरील  टेकडीवर या गणेशाची उपासना केली गेली.

टेकडीचा दोन शे पंच्याऐंशी पायऱ्या चढल्यावर गुफेतील गिरीजात्मकाच्या मंदिर येते.

मोरगावला मुंबई व पुण्यावरुन बस जातात.