नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री जयती गजानन कसबा पेठ पुणे.

पुणे शहरात जयती गजाननाला कसबा पेठ गणपती किंवा मानाचा गणपती असंही म्हणतात.

आदिलशहाच्या जाचाला कंटाळून काही ठकार कुटूंबे पुण्यात येऊन स्थिरावली होती.

त्यावेळी एका गणेशभक्ताला दृष्टांत झाल्यामुळे त्याने मुठा नदीच्या किनारी शमी वृक्षाजवळ गणेश  मूर्तीची स्थापना केली

. जिजाऊंनी तेथे १६३६ ला मंदिर बांधले आणि पुढे सभामंडप पेशव्यांनी बांधला.

हे मंदिर भक्कम दगडीचे आहे.  कसबा म्हणजे प्राचीन. कसबा हा फारसी शब्द आहे.

मोठय़ा तांब्याच्या आकाराची ही गणेशमूर्ती साडेतीन फूट उंच सुमारे पाच फूट रुंद अशी आहे