नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री दशभुज चिंतामणी सहकारनगर पुणे

श्री दशभुजा चिंतामणीची मूर्ती ओंकारस्वरूप घडवलेली आहे.

भाळी ओमकार, तीन डोळे असलेली ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणेश यंत्राप्रमाणे गाभार् यावर रचना केली गेली आहे.

मंदिरासमोर उंदराचे लहानसे मंदिरदेखील आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील गर्भगृहावर मोठी काळी भावली आहे.

श्रींना दृष्ट लागू नये हे त्यामागचे प्रयोजन असावे. येथे बरीच अनुष्ठाने व कर्मकांडे झालेली आहेत.

श्री दशभुजा चिंतामणीची मूर्ती दामोदर खंडाळकर यांना विहीर खणताना सापडली हाेती.

ही मूर्ती अतिप्राचीन असल्याचं समजते. हे स्वयंभू नर्मदेश्वर गणेश स्थान असल्याचेही समजते.